अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताच्या संघामध्ये प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता

भारताच्या संघाने आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये शुभमन गिलची तब्बेत ठीक नसल्यामुळे इशान किशन याला संधी दिली होती.

    भारत विरुद्ध अफगाणिस्तान : भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कांगारूंचा पराभव केल्यानंतर आता भारताचा संघ वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. शुभमन गिल बारा असला तरी तो पूर्णपणे तंदुरुस्त व्हायला अजून वेळ लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरतील. पण यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी काही बदल पाहायला मिळतील का? हे जाणून घेऊ.

    भारताच्या संघाने आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये शुभमन गिलची तब्बेत ठीक नसल्यामुळे इशान किशन याला संधी दिली होती. परंतु इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाले होते. म्हणजे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. २०० धावांचं टार्गेट होतं, म्हणून विराट कोहली आणि केएल राहुलनं सामना वाचवला. मात्र शून्यावर आऊट होऊनही या तिन्ही खेळाडूंच्या जागेला कोणाताही धोका नाही हे निश्चित आहे. विराट कोहली आणि केएल राहुल हे शेवटच्या सामन्याचे हिरो होते, त्यामुळे त्यांच्या जागेचा कोणाताही विचार करण्याची गरज नाही. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजाही खेळताना दिसणार आहेत. पण भारतीय संघात एक बदल होताना दिसत आहे तो म्हणजे रविचंद्रन अश्विनच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते.

    अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
    रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज