भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट, पाहा लाईव्ह अपडेट

IND vs AUS 2nd ODI Weather Update : मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे.

  IND vs AUS 2nd ODI Weather Update : काल झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दणक्यात पराभव केल्यानंतर आता पुढील सामन्याचे वेध लागले आहेत. जर दुसरा सामना भारताने जिंकला तर या मालिकेत टीम इंडियाचा विजय होईल. दरम्यान, पुढील सामना इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरू पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
  दुसरीकडे कांगरू पलटवार करण्यास तयार
  मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथील होळकर स्टेडिअवर होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरू पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
  सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. रविवारी आता मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे संकट आहे.  हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी इंदूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्यादरम्यान पावसाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (एमपीसीए) विशेष व्यवस्था केली आहे.
  दुसऱ्या वनडेत मुसळधार पाऊस
  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर रोजी इंदौरध्ये ढगाळ वातावरण असेल. सायंकाळनंतरही इंदौरमध्ये पावसाची शक्यता आहे. इंदौरमध्येही सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
  पावसाचा सामना करण्यासाठी इंदौर स्टेडिअम तयार
  मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मीडिया मॅनेजरने सांगितले की, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट असल्याने आम्ही काही विशेष व्यवस्था केली आहे. पाऊस पाहता या स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यात आली आहे. खेळपट्टी आणि मैदान कव्हर करण्यासाठी नवीन कव्हर्सही खरेदी करण्यात आली आहेत.
  सामन्याची वेळ काय?
  भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळले जातील. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.
  कुठे पाहाल सामना
  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमावर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.
  भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याचा लेखाजोखा
  मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे.