आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी २० सामना

  दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या विश्वचषकापूर्वी (World Cup) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात टी २० मालिका खेळवली जात आहे. यांच्यातील पहिली मालिका ही २० सप्टेंबर रोजी खेळवण्यात आली असून यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज २३ सप्टेंबर रोजी या मालिकेतील दुसरा सामना पार पडणार असून हा सामना म्हणजे भारताची या मालिकेतील ‘करो या मारो’ ची लढाई असणार आहे.

  सध्या टी २० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम ही भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना हा मोहाली येथे खेळवण्यात आला होता. मात्र दुसरा सामना हा नागपूर येतेच खेळवला जाईल. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास मालिकाही ते आपल्या नावे करतील. तर भारतीय संघ (Team India) सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आज चा सामना सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. तर त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना महाराष्ट्रातील नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

  भारतीय संघ :

  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.

  ऑस्ट्रेलिया संघ :

  आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.