आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे, कोहली-रोहितशिवाय टीम इंडिया; सामना कसा व कुठे पाहणार? आकडेवारीत कोण भारी?

ही मालिका भारताचे दिग्गज व स्टार खेळाडू विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याशिवाय होणार आहे. के एल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळं विश्वचषकापूर्वी भारत कशी कामगिरी करतोय, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

    मोहाली – नुकतेच भारतीय क्रिकेट टीमने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत, आशिया कपवर आपले नाव कोरले. यानंतर आता पुढील महिन्यात क्रिकेटचा महामेळावा, महासंग्राम अर्थात भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 3 मॅचच्या वनडे सीरिजला आजपासून (शुक्रवार 22 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे ही मालिका भारताचे दिग्गज व स्टार खेळाडू विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याशिवाय होणार आहे. के एल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळं विश्वचषकापूर्वी भारत कशी कामगिरी करतोय, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. (India vs Australia first ODI match today, Team India without Kohli-Rohit; How and where to watch the match)

    कोहली-रोहितशिवाय टीम इंडिया…

    दरम्यान, विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जाते. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. आजचा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या हे पहिले दोन सामने खेळणार नाहीत. त्यामुळं या खेळाडूंशिवाय भारताची कामगिरी कशी होते, हे पाहावे लागेल. ऑस्ट्रेलियाची या वर्षातील ही दुसरी एकदिवसीय मालिका आहे. त्याआधी मार्च 2023 मध्ये झालेली एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली होती.

    आकडेवारीत कोण वरचढ

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अजूनपर्यंतचा एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहता, आकडेवारी ही कांगारुंच्या बाजूनी आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 146 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कांगारुंनी 146 पैकी 84 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 54 वेळा पराभवाची धुळ चारली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापेक्षा 30 सामने जास्त जिंकले आहेत.

    टीम इंडिया टीम – केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

    ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम – पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.