भारताच्या संघाला आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग – ११

मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप आधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु झाली आहे. पहिला वनडे सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात झाला. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. आज दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअमवर रंगणार आहे. मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअमवर होणार आहे.

    हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरु पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना होईल. हा सामना दुपारी १.३० पासून खेळले जातील. एक वाजता नाणेफेक होईल. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा ऍपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.

    भारताची संभाव्य प्लेईंग ११ –

    शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर / कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी

    ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग ११-

    डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कैमरून ग्रीन, जोश इंगलिस (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट आणि एडम जम्पा