India vs Australia ODI Series

    मोहाली/आयएस बिंद्रा स्टेडियम : भारतासमोर 277 धावांचे लक्ष्य असताना, टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली. सलामी जोडीने शतकी भागीदारी करीत विजयाची मुहूर्तमेढ रोवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाडने 77 चेंडूत 71 धावा केल्या. तर शुभमन गिलने 63 चेंडूत 74 धावा केल्या. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर हा अवघ्या 3 धावांवर रनआऊट झाला. त्यानंतर आलेला केएल राहुलने संयमी खेळी करत अर्धशतक ठोकले चौकर ठोकत त्यांनी आपले अर्धशतकर पूर्ण केले. तर इशांत किशन लवकर 18 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमार देखील साजेशी खेळी करत ५१ धावांची खेळी साकारली यानंतर तो फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. मग रवींद्र जडेजाने व राहुलने एक एक धाव काढत भारताला विजय मिळवून दिला.

    भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवातच निराशाजनक राहिली. सलामी जोडी मिचेल मार्श आणि डेव्हीड वॉर्नरची सुरुवात थंडच झाली. मिचेल मार्श अवग्या 4 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथला शमीने त्रिफळाचित करून पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मार्नस लाबुशिंगे अश्विनच्या चेंडूवर स्टम्पिंग झाला. डेव्हीड वॉर्नरने 53 चेंडूत 52 धावा करीत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली. आता कॅमरून ग्रीन आणि जोश इंग्लीश खेळत आहेत.

    आज कॅमरून ग्रीन चांगला खेळत असतानाच सूर्यकुमार यादवच्या चपळतेने तो रनआऊट झाला. एका खराब चेंडूवर धाव घेत असलाना, कॅमरून रनआऊट झाला. त्यानंतर जोश इंगिसनेसुद्धा चांगल्या धावा जोडल्या. त्याने 45 चेंडूत 45 धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टोनीसला शमीने त्रिफळाचित करून पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. मॅथ्यू शोर्ट हा अवघ्या 2 धावा करून बाद झाला. सिन अबोट हा 2 धावांवर क्लिनबोल्ड झाला. त्याला शमीनेच पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. अॅडम झम्पा हासुद्धा आज रन आऊट झाला. तो अवग्या 2 धावा करून तंबूत परतला.
    आज अॉस्ट्रेलिया संघाचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अॉस्ट्रेलियाचा संघाची रनिंग बिटविन द विकेट अत्यंत खराब झाल्याचे पाहायला मिळाले. आज त्यांचे 2 फलंदाज रनआऊट झाल्याचे पाहायला मिळाले.
    भारतीय संघ : शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कॅन्डर वके), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
    ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (wk), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (सी), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा