भारताचा कांगारूंवर 99 धावांनी दणदणीत विजय; भेदक गोलंदाजीसमोर टीम ऑस्ट्रेलिया गारद

आज भारताने 99 धावांनी विजय प्राप्त करीत ही मालिका खिशात टाकली. पाऊस पडल्याने 317 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवण्यात आले होते. ते गाठणेदेखील कांगारूंना शक्य झाले नाही. 33 ओव्हरपर्यंत मॅचचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु, त्याअगोदरच ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कांगारूंवर 99 धावांनी दणदणीत विजय, भेदक गोलंदाजी आणि शानदार 2 शतकांच्या मदतीने टीम इंडियाचा शानदार विजय

    टीम इंडियाने दमदार विजय प्राप्त केला आहे. भारताकडून गोलंदाजाची कामगिरी जबरदस्त झाली. आर अश्विनने 3 विकेट, जडेजाने 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमीने 1 क्लिन बोल्ड केला. त्यानंतर नवख्या प्रसिध क्रिष्णाने 2 विकेट घेतल्या.

     

    सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये शुभमन गिलने शानदार शतक झळकावले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. गिलने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकात ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. याआधी गिलने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने ६३ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या. तेव्हा शुभमन गिलचे शतक हुकले होते.

    श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर वनडेमध्ये शानदार शतक झळकावले. या खेळाडूने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. या शतकासह श्रेयस अय्यरने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपला उत्साह व्यक्त केला आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने ९० चेंडूत १०५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार मारले. यापूर्वी मोहाली वनडेत श्रेयस अय्यर लवकर बाद झाला होता. मात्र या सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे.

    ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला १६ धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. सलामीवीर रुतुराज गायकवाड १२ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली.