भारताचा सामना कांगारूंशी, प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल, जाणून घ्या आजच्या सामन्याची प्लेइंग ११

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर लाल आणि काळ्या मातीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या खेळपट्ट्या आहेत.

  वर्ल्ड कप २०२३ : वर्ल्ड कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा आर अश्विनला संघामध्ये स्थान देण्यात आले नाही. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर आर अश्विनला भारतीय विश्वचषक संघात स्थान देण्यात आले. आता तो केवळ या संघाचा भाग नाही तर प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट होण्याच्या शर्यतीत त्याने इतर गोलंदाजांनाही मागे टाकले आहे. आज (८ ऑक्टोबर) होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. क्रिकेट तज्ज्ञही त्याला आजच्या सामन्यात मोठा गेम चेंजर म्हणत आहेत.

  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर लाल आणि काळ्या मातीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या खेळपट्ट्या आहेत. आजचा सामना काळ्या मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. काळ्या मातीची खेळपट्टी थोडी संथ असून त्यावर वळणेही चांगली आहेत. अशा स्थितीत आजच्या सामन्यात फिरकीपटूंचा मोठा वाटा असणार हे नक्की.

  भारताच्या संघाची संभाव्य प्लेइंग ११
  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  ऑस्ट्रेलियाच्या संघांची संभाव्य प्लेइंग ११
  डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा. (मार्कस स्टोयनिस अद्याप पूर्णपणे रिकव्हर झालेला नाही. अशातच त्याच्याऐवजी कॅमरुन ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता आहे.)