वर्ल्ड कप फायनलच्या आधी मोहम्मद शमीची आई करतेय प्रार्थना, म्हणाली…

विश्वचषकात मोहम्मद शमीने आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ६ सामन्यात २३ विकेट आहेत.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक २०२३ फायनल : आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चा फायनल आज म्हणजेच रविवारी गुजरातमधील अहमदाबाद शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक २०२३ मधील दोन सर्वोत्तम संघ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना होणार आहे. भारताच्या विजयासाठी देशभर प्रार्थना सुरू आहेत. भारतीय संघाच्या विजयासाठी सर्वजण फक्त प्रार्थना करत आहेत. भारताने शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता.

    खेळाडूंचे कुटुंबीयही भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. या विश्वचषकात यूपीच्या अमरोहा येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. संपूर्ण देशासोबतच मोहम्मद शमीच्या आईलाही अंतिम फेरीत आपल्या मुलाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

    काय म्हणाली मोहम्मद शमीची आई?
    क्रिकेटर मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना सांगितले की, देवाने मुलांना (भारतीय क्रिकेट संघ) अंतिम सामन्यात विजय मिळवून द्यावा आणि त्यांना विश्वचषकासह आनंदाने घरी परत आणावे. या विश्वचषकात मोहम्मद शमीने आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ६ सामन्यात २३ विकेट आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत घेतलेल्या ७ विकेट्सचाही समावेश आहे.

    मोहम्मद शमीने या विश्वचषकात आतापर्यंत तीन वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. जे सर्वोच्च आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा शानदार सामना पाहण्यासाठी पीएम मोदींसह अनेक व्हीआयपी मैदानात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सुमारे १.२५ लाख लोक भारतीय संघाचा उत्साह वाढवण्याचे काम करतील.