
भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं २-१ नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने शेवटचा विश्वचषक २०११ साली जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले पण भारताचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी त्याच्या होस्टिंगच्या भूमिकेत १२ वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागले असून हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याची मोहीम ८ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. विश्वचषक २०२३ स्पर्धेतील टीम इंडियाच्या मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. या दिवसरात्र सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं दिले आहेत.
भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं २-१ नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑसी टीमची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे. आज भारतीय क्रिकेट संघ पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा आजचा सामना विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्ससाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात तीन स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. म्हणजेच, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत आर अश्विनही प्लेइंग-11 मध्ये असू शकतो.