आशियाई खेळाच्या फायनलच्या कब्बडी सामन्यांमध्ये खेळाडूंचा राडा, भारताचे कोच भडकले

भारताचा कर्णधार पवन शेरावत हा रेड करण्यासाठी गेला आणि तो कोणालाही हात न लावता लॉबी मध्ये गेला त्यांच्या सोबत इराणचे काही डिफेंडर सुद्धा लॉबी मध्ये गेले.

    भारत विरुद्ध इराण : आज भारताची सुरुवात सुवर्ण पदकांनी झाली. भारत विरुद्ध इराण यांच्यामध्ये दमदार कब्बडी सामना सुरु होता. भारताचा कर्णधार पवन शेरावत हा रेड करण्यासाठी गेला आणि तो कोणालाही हात न लावता लॉबी मध्ये गेला त्यांच्या सोबत इराणचे काही डिफेंडर सुद्धा लॉबी मध्ये गेले. परंतु खराब अंपायरिंगमुळे दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आला आहे. यावरूनच भारताचे कोच मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी अंपायरशी बराच वेळ संवाद सुरु होता.

    कब्बडीच्या नियमानुसार कलम २८ मध्ये असे म्हंटले जाते की जर एखाद्या बचावपटूने मैदानाला स्पर्श केला आणि कोर्टाच्या बाहेर गेला तर बचावपटूला आउट समजले जाईल, रेडरला नाही.