भारत विरुद्ध आयर्लंड टी 20 मालिकेतील पहिला सामना आज, भारतीय संघात ‘या’ खेळाडूला मिळणार संधी, सामना कुठे पाहता येणार?

युवा ब्रिगेडचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड (Jasprit Bumrah will do. So Rituraj Gaikwad) याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज द व्हिलेज डब्लिन इथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

  डब्लिन – आशिया स्पर्धेपूर्वी टिम इंडिया आजपासून आयर्लंडविरोध तीन टि – 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. (India Vs Ireland T-20) नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या युवा ब्रिगेडचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड (Jasprit Bumrah will do. So Rituraj Gaikwad) याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज द व्हिलेज डब्लिन इथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. (India vs Ireland t20 series first match today, chance for ‘this’ player in Indian team, where to watch the match)

  कुणाला मिळणार संधी?

  दरम्यान, दुसरीकडे संघात आज काही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून दोघांना पदार्पणाची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. जितेश शर्मा याची याआधी श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत निवड करण्यात आली होती. मात्र त्याला दोन्ही मालिकेत संधी काही मिळाली नाही. टीम इंडियाकडून रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या दोघांना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. रिंकू सिंह याचा टीम इंडियासाठी पहिलाच दौरा आहे. या दोघांना पहिल्या सामन्यात संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय.

  जसप्रीत बुमराह पुनरागमन

  या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार आहे. तसेच तो संघाचे नेतृत्व देखील करणार आहे. तसेच मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळं या दोन खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे निवड समितीचे लक्ष आहे. आशिया चषकापूर्वीची आयर्लंड मालिका ही भारतीय खेळाडूंसाठी तंदुरुस्तीची चाचणी असेल. बुमराह 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

  संभाव्य भारतीय संघ-

  जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

  संभाव्य आयर्लंड संघ-

  पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.