पावसामुळे मॅच अनिर्णीत; भारताने १-०ने सीरीज जिंकली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना नेपियर येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली – भारताची खेळी झाली सुरूप्रत्युत्तरात टीम इंडियाने ३ षटकांत ३ गडी गमावून २३ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव मैदानावर आहेत. इशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर तिसर्‍या टी-२० मध्ये काहीही करू शकले नाहीत. ईशानने १० धावा केल्या, पंतने ११ धावा केल्या आणि श्रेयस अय्यर खाते न उघडता बाद झाला. टीम इंडियाने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या. पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. दरम्यान, सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर होत असते. पण एकही चेंडू टाकायला वाव नसल्याने अशा स्थितीत सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना नेपियर येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    किवी संघ १९.४ षटकांत सर्वबाद १६० धावांवर आटोपला. डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. त्याचवेळी ग्लेन फिलिप्सने ५४ धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक ४-४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या शेवटच्या ७ विकेट १४ धावांवर पडल्या.