India vs New Zealand Semi Final
India vs New Zealand Semi Final

  World Cup 2023 India vs New Zealand Semi Final : भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. एकदिवसीय 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड कप 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून प्रबळ दावेदार बनला आहे.

  या वर्ल्ड कपमध्ये चारपैकी तीन भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ आधीच उपांत्य फेरीत गेले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत आहेत, ज्यात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि या संघांचा समावेश आहे.

  पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास बंद

  पण पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. पाकिस्तान संघ न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावर लक्ष ठेवून होता. एकतर पावसामुळे सामना खराब होईल किंवा श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडला पराभूत करेल अशी आशा बाबर आझमला वाटत होती, पण दोघांपैकी काहीही झाले नाही. उलट न्यूझीलंडने 25 षटकांपूर्वी सामना संपवला.

  उपांत्य फेरीत जाण्यासाठी 99 टक्के जागा निश्चित

  न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत जाण्यासाठी 99 टक्के जागा निश्चित केली आहे. तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा मार्ग आता कठीण झाला आहे. पण पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर इंग्लंडला 287 धावांनी पराभूत करावे लागेल, तर नंतर फलंदाजी आली तर सामना 2.4 षटकांत संपवावा लागेल. जे इतके सोपे वाटत नाही.

  पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात

  वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होऊ शकतो. यामागचे कारण म्हणजे न्यूझीलंड संघाने 5 विजयांसह 10 गुण मिळवले असून नेट रनरेटच्या आधारावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा खूप पुढे आहे.

  पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला अजून प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. पाकिस्तानला गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळायचा आहे.

  पाकिस्तान संघाने इंग्लंडला हरवले तरी 10 गुण नक्कीच

  पाकिस्तान संघाने इंग्लंडला हरवले तरी 10 गुण नक्कीच मिळतील, पण कदाचित नेट रनरेटच्या बाबतीत ते न्यूझीलंडला मागे सोडू शकत नाही. तीच गोष्ट अफगाणिस्तानची आहे की दक्षिण आफ्रिकेला हरवल्यास त्याचे 10 गुण होतील, पण नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंडला मागे टाकता येणार नाही. न्यूझीलंड संघाने 9 पैकी 5 सामने जिंकले असून या संघाचा नेट रनरेट +0.922 आहे.