भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यामध्ये काय असेल भारताचा मास्टर प्लॅन, रोहित शर्माची प्रतिक्रिया

अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

    भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला : भारताने विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. आता पाकिस्तानची नंबर आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या मोठ्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

    अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर मोठे वक्तव्य केले आहे. जेव्हा रोहित शर्माला भारत-पाक सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, आपण बाह्य गोष्टींबद्दल काळजी करू नये आणि फक्त त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आम्हाला फक्त चांगली कामगिरी करायची आहे.

    रोहितने भारत-पाकिस्तान सामन्यावर वक्तव्य केलं होतं
    रोहित पुढे त्याच्या विधानात म्हणाला, “खेळपट्टी कशी असेल किंवा कोणत्या संयोजनासोबत खेळता येईल यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो. बाहेर काय घडत आहे याची आम्ही काळजी करणार नाही. आम्ही फक्त “आम्ही काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहोत. खेळाडू आणि आम्ही कशी कामगिरी करू शकतो.”

    भारताचा संघ कर्णधार म्हणाला, “(तो) आमच्यासाठी चांगला विजय होता, स्पर्धेच्या सुरुवातीला ती (विजयी) लय मिळवण्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने अवघ्या २ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. त्या सामन्याबद्दल रोहित म्हणाला, “विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दडपण सहन करणं महत्त्वाचं होतं.”