श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर तर के एल राहुलचं कमबॅक, भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याला सुरुवात

जसप्रीत बुमराहचेही टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. बुमराहने संघामध्ये आगमन केल्यामुळे मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला आहे.

  भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम यांच्यामध्ये नाणेफेक झाले आणि बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दोन बदल केले आहेत. केएल राहुलने दुखापतीनंतर कमबॅक केलं आहे. तर जसप्रीत बुमराहचेही टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. बुमराहने संघामध्ये आगमन केल्यामुळे मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला आहे.

  भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या जागी केएल राहुल याला संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर याने दुखापतीनंतर नुकतेच भारताच्या संघामध्ये कमबॅक केले होते. परंतु त्याची पुन्हा एकदा पाठीची दुखापत बळावली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात अय्यरला प्लेईंग ११ मधून बाहेर बसावे लागले. अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोघांनी प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर याला पाठदुखीमुळे पाकिस्तानविरोधात खेळू शकत नाही, अशी माहिती कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी दिली. अय्यरच्या जागी राहुलला स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता.

  भारताची प्लेइंग ११
  शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  पाकिस्तानची प्लेइंग ११
  बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.