भारत विरुद्ध पाकिस्तान, U19 आशिया चषक, जाणून घ्या कुठे पाहता येणार महामुकाबला?

आशिया चषक अंडर-19 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत होणार आहे. त्याच वेळी, क्रिकेट चाहत्यांना एशियन क्रिकेट कौन्सिलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

  भारत विरुद्ध पाकिस्तान : अंडर-19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले आहे. आज भारतीय संघाला पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यापूर्वी, भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्याचवेळी आता पाकिस्तानचा संघ समोर असला तरी क्रिकेट चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, भारत-पाकिस्तान सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण होणार नाही, परंतु तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थेट कसा पाहायचा?

  आशिया चषक अंडर-19 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत होणार आहे. त्याच वेळी, क्रिकेट चाहत्यांना एशियन क्रिकेट कौन्सिलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. पण टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार नाही. यासाठी तुम्हाला एशियन क्रिकेट कौन्सिलच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर जावे लागेल, जिथे तुम्ही मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.

  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन-
  आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, सचिन दास, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी आणि नमन तिवारी.

  पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन-
  साद बेग (कर्णधार), शाहजेब खान, अझान अवेस, शमेल हुसैन, रियाझ उल्लाह, अराफत मिन्हास, अली असफद, आमिर हसन, उबेद शाह, मोहम्मद झीशान, तय्यब आरिफ.