विराट कोहलीने दिली इंडियाची जर्सी बाबर आझमला भेट, वसीम अक्रमचा संताप अनावर

सामन्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री आणि आदर दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

    भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप २०२३ : काल पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानचा चांगलाच धुराळा उडवला. भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला वर्ल्ड कप मध्ये हरवत आणखी एक विजयाची नोंद केली आहे. भारत भूमीत टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेटमध्ये टशन असली तरी दोन्ही संघांतील खेळाडूंचे एकमेकांशी खास नातं आहे आणि हे नातं भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघातील मैत्री भारत-पाकिस्तान सामन्यानंतर दिसून आली.

    इंडिया विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यातील खास क्षण समोर आले आहेत. सामन्यानंतर विराट कोहलीने बाबर आझमला साईन केलेली जर्सी भेट दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि बाबर आझम यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. क्रिकेटच्या मैदानात जरी हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरोधात असले तरी, दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. बाबर आझमने अनेक वेला मुलाखतीमध्ये हे सांगितलं असून कोहलीचं कौतुकही केलं आहे. तर विराट कोहलीनं बाबर आझमचं कौतुक केलं आहे.

    सामन्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री आणि आदर दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला. क्रिकेट चाहत्यांला हा क्षण आवडला असून अगदी मनात उतरला आहे, पण पाकिस्तानी दिग्गज माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम नाराज झाला आहे. विराट कोहलीने बाबर आझमला जर्सी भेट दिल्यावर वसीम अक्रम संतापला आहे. वसीम अक्रम एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ”बाबर आझमला आज असं करायला नको होतं. हे चित्र पाहिल्यावर मला वाटलं की आज हा दिवस नाही. जर तुम्हाला असं करायचं असेल आणि तुमच्या काकांच्या मुलाने कोहलीची जर्सी मागितलीच होती तर, तुम्ही मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्याकडून ती जर्सी घ्यायला हवी होती मैदानात नाही.”