आज होणार भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, शर्यतीत भारताचा कर्णधार अव्वल स्थानावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी-२० धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. पण सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंचा पहिल्या पाचमध्ये समावेश नाही.

    भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेत टी-२० चा रेकॉर्ड चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी-२० धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. पण सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंचा पहिल्या पाचमध्ये समावेश नाही.

    रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक टी-२० धावा केल्या आहेत. रोहितने १७ सामन्यात ४२० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माने सर्वोत्तम धावसंख्या १०६ धावा केली आहे. सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने १२ सामन्यात ३३९ धावा केल्या आहेत. त्याने शतक झळकावले आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने १३ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. शिखर धवन चौथ्या आणि दिनेश कार्तिक पाचव्या स्थानावर आहे. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाले तर त्याने ४ सामन्यात १८७ धावा केल्या आहेत.