आयर्लंडविरोध पहिल्या टी-20 सामन्यात भारत 2 धावांनी विन; भारत कशामुळं विजयी ठरला माहितेय?

सामन्यात भारताने आयर्लंडवर दोन धावांनी विजय मिळवला आहे. पहिला टी 20 सामना डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

    डब्लिन – आशिया स्पर्धेपूर्वी टिम इंडिया कालपासून (शुक्रवार) आयर्लंडविरोध तीन टि- 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. (India Vs Ireland T-20) नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी-20 चा काल पहिला सामना खेळविण्यात आला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह  तर ऋतुराज गायकवाड (Jasprit Bumrah, Rituraj Gaikwad) याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. कालच्या सामन्यात भारताने आयर्लंडवर दोन धावांनी विजय मिळवला आहे. पहिला टी 20 सामना डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (india win by two runs in first T20 against Ireland; The rain came and)

    आयर्लंडकडून 140 धावांचे आव्हान…

    भारताने नाणेफेक जिंकत आयर्लंडला फलंदाजी दिली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच आयर्लंडला झटके दिले. बॅरी मॅककार्थी याने आयर्लंडकडून सर्वाधिक 51 धावा केल्या. बॅरीने 33 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 51 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह याने 1 विकेट घेतली. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. भारताला विजयासाठी आयर्लंडकडून 140 धावांचे आव्हान देण्यात आले.

    6.5 ओव्हर 2 बाद 47 रन्स, डकवर्थ लुईसनुसार

    दरम्यान, भारताने आश्वासक सुरुवात केली. 140 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी 46 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी 24 धावांवर आऊट झाला. पुढच्याच बॉलवर म्हणजेच सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर तिलक वर्मा झिरोवर कॅच आऊट झाला. पुढे आणखी 2 बॉल टाकले गेले. त्यानंतर पावसाने सुरुवाती केली. पावसामुळे खेळ थांबला. यावेळी टीम इंडियाचा स्कोअर 6.5 ओव्हरमध्ये 2 बाद 47 धावा असा होता. मात्र अखेर डीएलएसनुसार टीम इंडियाला दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या विजयासह टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.