भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने विजय

    नागपूर : टी २० विश्वचषकापूर्वी (World Cup) भारतात सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) मालिकेतील दुसरा सामना काल शुक्रवारी पार पडला. पावसामुळे हा सामना ८ षटकांचा खेळवण्यात आला असून सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियायाला नमवत मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली आहे.

    सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खास झाली नाही, भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करत सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. अक्षरने सामन्यात महत्त्वपूर्ण असे दोन विकेट घेतले. तर बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला ३१ धावांवर माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने धावसंख्या ९० पर्यंत नेली.प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडच्या नाबाद ४३ धावांच्या जोरावर ९१ धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं.

    भारताच्या विकेट्स पडल्या पण कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून टिकून राहत दमदार फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने २० चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत नाबाद ४६ धावा केल्या. स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने शेवटच्या ओव्हरच्या दोन चेंडूत १० धावा करत भारताचा विजय पक्का केला. ज्यामुळे भारताने ६ आणि ४ चेंडू राखून सामना जिंकला.