कॅामनवेल्थ गेम्सच्या सहाव्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालं कांस्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 14 पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकले आहेत

    बर्मिंगहॅम कॅामनवेल्थ गेम्सच्या सहाव्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टिर्सनी दमदार कामगिरी केली. वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहनं (Lovepreet Singh) देशासाठी कांस्यपदक जिंकलं आहे. लवप्रीत सिंहनं स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवलं आहे. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदकसंख्या सहा सुवर्णासह चौदावर पोहचलीय.

    वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहनं चांगली कामगिरी केली. दरम्यान, स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्यानं 157 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं.

    वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सर्वाधिक पदकं

    राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 14 पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकले आहेत