भारताचा आयर्लंडवर 7 विकेट्सने विजय! भारतासमोर होतं 109 धावांचं आव्हान

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला.

    भारतीय संघात आयर्लंड विरुद्ध पहिला टी20 सामना काल खेळला गेला. टी-20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. पावसामुळे सुमारे अडीच तासांनंतर सामना सुरू झाला. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंच्या फौजेने हा विजय मिळवला आहे. पावसामुळे सामना 12 ओव्हर्सचा करण्यात आला होता. अशामध्ये दोन्ही संघानी प्रत्येकी 12 ओव्हर खेळल्या, ज्यात आधी आयर्लंडने 108 धावा करत 109 धावांचं आव्हान भारताला दिलं. जे भारताने 9.2 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.

    भारतानं दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला. दीपक हुडा 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद राहिला आणि दिनेश कार्तिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियानं आयर्लंडविरुद्ध 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना मंगळवारी होणार आहे.