आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं जिकंली पाच पदकं, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश, हॉकी संघाचा मोठा विजय

भारताला पहिले पदक रोइंगमध्ये मिळाले, अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइट वेट दुहेरीत रौप्यपदक जिंकले.

    आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) पहिल्याच दिवशी भारतीय संघाने विविध खेळांमध्ये पदके जिंकून ध्वजारोहण सुरू केले आहे. भारताच्या दिवसाची सुरुवात रौप्य पदकाने झाली. भारताच्या अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्स स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. एवढेच नाही तर महिला संघाने 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात रौप्य पदक पटकावले. या संघात रमिता, मेहुल घोष आणि आशी चौकसी यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.

    भारताला रोइंगमध्ये मिळालं पहिलं पदक

    भारताला पहिले पदक रोइंगमध्ये मिळाले, अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइट वेट दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत 6:28:18 गुणांसह भारतासाठी रौप्यपदक जिंकण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताचे दुसरे पदक महिला संघाने पटकावले. मेघुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी भारतासाठी दिवसाचे दुसरे पदक जिंकले. भारताला पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत लाइट वेट दुहेरी रोईंगमध्ये पदक मिळाले आहे.

    भारताने आतापर्यंत ‘या’ स्पर्धांमध्ये जिंकली 5 पदकं

    10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
    पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
    पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
    पुरुष कॉक्सड 8 संघ (रोइंग): रौप्य
    महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य