स्पेनचा पराभव करुन भारतानं जिकंली FIH नेशन महिला हॉकी स्पर्धा!

शनिवारी स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान स्पेनचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

    स्पेन : स्पेनमध्ये पार पडलेल्या FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.(FIH Women’s Nations Cup 2022) चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या भारताने (Indian Women Hockey Team) स्पेनचा (Spain) पराभव करत स्पर्धेच विजेतेपद पटकावलं आहे. या विजयासह भारतीय महिला संघाचं FIH महिला हॉकी प्रो लीगमधील स्थान पक्कं झालं आहे.

    शनिवारी स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान स्पेनचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला गुरजीत कौरने भारतासाठी निर्णायक गोल केला. विशेष म्हणजे संपूर्ण सामन्यात यजमान स्पेनला एकही गोल करता आला नाही. त्यांच्या या विजयावर देशभरतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांच्यासह हॉकी झारखंडचे सरचिटणीस विजय शंकर सिंग, सीईओ रजनीश कुमार, उपाध्यक्ष मनोज कोनबेगी, कोषाध्यक्ष अश्रिता लाक्रा यांनी भारतीय संघाच्या विजयाबद्दल हॉकी झारखंडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.