वनडेतही भारत नंबर-1,  भारताने किवींवर मिळवले निर्भेळ यश, न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव

टीम इंडियाने ठेवलेल्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. शून्य धावांवर असताना हार्दिक पांड्याने फिन अॅलनला बाद केले मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत त्याने अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली.

    इंदोर- टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप दिला. या निकालाचा अर्थ असा की, भारतीय संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 संघ बनला आहे. भारतीय संघ आधीच टी- 20 मध्ये नंबर-1 आहे. तर कसोटी क्रमवारीत संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 90 धावांनी जिंकत मालिकेत ३-०ने निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 9 बाद 358 धावा धावफलकावर लावल्या.

    न्यूझीलंडचा डाव २९५ धावांवर आटोपला
    टीम इंडियाने ठेवलेल्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. शून्य धावांवर असताना हार्दिक पांड्याने फिन अॅलनला बाद केले मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत त्याने अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली. त्यावेळी तो 47 चेंडूत 57 धावांवर खेळत होता. किशनच्या एका चुकीमुळे टीम इंडिया इंदोरच्या सामन्यात संकटात सापडली होती. अखेर तो 138 धावा करून तो बाद झाला, अन्यथा भारताला सामना जिंकणे अवघड होते तरीदेखील तब्बल 81 धावांचा फटका भारताला बसला. अखेर न्यूझीलंडचा डाव २९५ धावांवर आटोपला.

    रोहित शर्मा, शुबमन गिलची शतकी खेळी
    भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि शुबमन मध्ये 212 धावांची सलामी भागीदारी झाली. रोहित शर्माने 83 चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला 9 चौकार आणि 6 षटकारांचा साज होता. हे त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले असून 19 जानेवारी 2020 नंतर रोहितने शतक झळकावले आहे. हे 30वे शतक ठरले ज्यापद्धतीने हे दोन्ही खेळतात आहे त्यानुसार कदाचित रोहित शर्मा आपले चौथे द्विशतक मारू शकत होता मात्र तो 101 धावांवर तो बाद झाला. तर शुबमन गिलने 72 चेंडूत शतक साजरे केले. गिलच्या या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. त्याने द्विशतकपासून जी सुरुवात केली होती ती अशीच पुढे ठेवली आहे. सलग 4 डावातील शुबमनचे तिसरे शतक ठरले असून ११२ धावा करून तो बाद झाला.