India vs Australia 1st t20
India vs Australia 1st t20

  India vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर टीम इंडिया पहिली द्विपक्षीय मालिका खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या फॉरमॅटमध्ये अनेक डावखुरे खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  भारताची खेळी

  विशाखापट्टणमवर सुरू असलेल्या अस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सान्यात भारताने 209 धावांचे आव्हान पार करीत मोठा विजय प्राप्त केला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार खेळी करीत 42 चेंडूत 80 धावा काढल्या त्याला इशान किशनने 58 धावांची चांगली साथ दिली. त्यानंतर रिंकू सिंहने विजयावर शिक्कामोर्तब केला.

  प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने दमदार फलंदाजी करीत धावांचा पाऊस पाडला. कांगारूंनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 200 पार धावसंख्या नेली. सलामीवीर स्विव्हन स्मिथ आणि मैथ्यू शोर्ट यांनी चांगली सुरुवात केली. स्टिव्हन स्मिथ याने चांगली सुरुवात केली. मैथ्यू शोर्टनंतर आलेल्या जोश इंग्लिसने धमाकेदार फलंदाजी करीत मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 50 चेंडूत 110 धावा करीत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 50 च्या स्पीडने पळवली. आज ऑस्ट्रेलियाने धावांचा पाऊस पाडत 20 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या.

  यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांसारख्या खेळाडूंनी अलिकडच्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु त्यांची पहिली कसोटी मजबूत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध असेल ज्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसारखे काही विश्वचषक विजेते खेळाडू असतील. ग्लेन मॅक्सवेल, लेगस्पिनर अॅडम झाम्पा आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.

  तरुण खेळाडूंची खरी परीक्षा असणार
  रिंकू सिंगने आतापर्यंत भारतासाठी खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये छाप पाडली आहे. यशस्वी, टिळक आणि मुकेश यांनाही हेच लागू होते, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या जितेशला इशान किशनच्या उपस्थितीमुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  खेळपट्टी आणि हवामान
  या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध येथे कमी धावसंख्येचा T20 सामना जिंकला. हवामान उष्ण आणि दमट राहील आणि दिवसा मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  भारतीय संघाचा नववा T20 कर्णधार
  2021 पासून टी-20 मध्ये भारताचे कर्णधार करणारा सूर्यकुमार यादव हा 9वा खेळाडू होता. या वर्षात हे पद मिळवणारा तो चौथा कर्णधार ठरणार आहे. त्याच्या आधी या वर्षी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि रुतुराज गायकवाड यांनी या फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले.
  नवराष्ट्रच्या ऑनलाइनच्या थेट ब्लॉगवरून लाईव्ह अपडेट
  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पाच सामन्यांच्या T-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. विश्वचषकातील पराभव विसरणे आणि त्यानंतर सूर्यकुमारला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 96 तासांत संघाचे नेतृत्व करायचे आहे, हे इतके सोपे काम नाही.