भारताची विजयी हॅटट्रिक! रोहितची बॅट तळपली अन् टीम इंडियाचा पाकिस्तान वर 7 विकेट्सने दणदणीत विजय

  अहमदाबाद : भारतीय संघ 192 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. भारताची सुरुवात तशी चांगली झाली. टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. अनेक दिवसांच्या अजारपणानंतर शुभमन मैदानात उतरला, त्याने चांगली सुरुवात देखील केली परंतु एक खराब फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला.

  रोहितची बॅट तळपली

  आज रोहितची बॅट तळपली त्याने धमाकेदार खेळी करीत 63 चेंडूत 86 धावा केल्या. कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्यानंतर श्रेय़स अय्यरनेसुद्धा नाबाद 53 धावांची खेळी करीत भारताय्या विजयात मोलाची भर टाकली. भारताच्या 2 विकेट गेल्याननंतर रोहित आणि श्रेयसने डावाला चांगला आकार मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली. श्रेयस्स अय्यरनेसुद्धा 62 चेंडूत 53 धावा करीत चांगली खेळी केली. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट राखून मोठा विजय प्राप्त केला.

  पाकिस्तानचा सर्व संघ 191 धावांवर गारद

  पाकिस्तानची फलंदाजी घसरल्यानंतर शेवटपर्यंत त्यांना डाव सावरता आला नाही. पाकिस्तानचा सर्व संघ 191 धावांवर गारद झाला. टीम इंडियासमोर 192 धावांचे लक्ष्य असताना, सलामी जोडी खेळायला उतरली आहे. ओपनिंगला शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली असताना, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार मारत टीम इंडियाने 2 ओव्हरमध्ये 22 धावा ठोकल्या आहेत.

  पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली असली तरी त्याला पहिले खिंडार सिराजने पाडले. अब्दुल्ला शफीकला अवघ्या 20 धावांवर त्याने बाद करीत. पाकिस्तानला पहिला धक्का दिल्यानंतर हार्दिकने इमाम उल हकने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव चांगलाच सावरला. परंतु, मोहम्मद सिराजने कर्णधार बाबर आझमला 50 धावांवर असताना क्लिन बॉल्ड करीत तंबूत पाठवले. मोहम्मद रिझवानला बुमराहने 50 धावासुद्धा करू दिल्या नाहीत. पाकिस्तानची सेट झालेली ही जोडी तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी ढासळली.

  पाकिस्तानची फलंदाजी घसरली

  मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर, कुलदीप यादवने त्याची जादू दाखवत साऊद शकील, इफ्तिकार अहमद यांना लवकरात लवकर पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. शकील आमि इफ्तिकार अहमद अवघ्या 6 आणि 4 धावा करून तंबूत परतले. शादाब खानला बुमराहने क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला.

  सर्वात हायहोल्टेज सामना

  आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमधील सर्वात हायहोल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने आतापर्यंत 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 41 धावा केल्या आहेत.

  आज बुमराहने दमदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या फलंदाजांना सुरुवातीलाच रोखून धरण्यात भारतीय संघाला चांगलेच यश आले आहे. तरीसुद्धा इमामने सिराजच्या पहिल्या षटकात 3 चौकार मारले. रोहितने 9 षटकासाठी हार्दिक पांड्याची निवड केली. तरीही पाकिस्तानकडून स्थिर सुरुवात झाली असली तरीही पाकिस्तानला पहिला धक्का देण्यात इंंडियाच्या गोलंदाजांना यश आले आहे.

   

  पाकिस्तानला पहिला धक्का

  पाकिस्तानला पहिला धक्का अब्दुल्ला शफीकच्या रुपाने लागला आहे. मोहम्मद सिराजने त्याला 20 धावांवर पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला.

   

  पाकिस्तान संघ : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (क), मोहम्मद रिझवान (व.), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
  भारतीय संघ : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज