भारतीय ब्रॉडकास्टर्स ICC Media Rights Auction वर टाकणार बहिष्कार

    यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ही स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून या विश्व चषकाकडे सध्या सर्व खेळाडूं आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र असे असतानाभारतीय प्रसारकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मीडिया राईट्सच्या लिलावावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारतीय प्रसारकांच्या या धमकीमुळे आयसीसी नाराज असून आयसीसीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. पण भारतीय प्रसारकांनी आयसीसीच्या निविदा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

    काही दिवसांपूर्वीच आयसीसीने मीडिया राईट्स लिलावापूर्वी मॉक ऑक्शनचे आयोजिन केले होते . मात्र यावेळी भारतातील टॉप-४ ब्रॉडकास्टर्स जसे स्टार स्पोर्ट्स, सोनी स्पोर्ट्स, झी आणि वायकॉम१८ इत्यादी या मॉक ऑक्शनमध्ये सहभागी झाले नाहीत. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ”हे खरोखरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. भारतीय प्रसारकांनी दाखवलेली ही वागणूक योग्य नाही. तसेच आम्ही जवळपास प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे, परंतु असे असतानाही भारतीय प्रसारकांची ही वृत्ती आश्चर्यकारक आहे.” असे आयसीसीने म्हंटले.

    आयसीसीकडून मॉक ऑक्शनचं आयोजन १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. मंगळवारी या ऑक्शनचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत भारतीय ब्रॉडकास्टर्सनी या मॉक ऑक्शनमध्ये सहभाग घेतलेला नाही. दरम्यान या मॉक ऑक्शनची तारीख १७ ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते.