भारतीय डाव 430 धावांवर घोषित, यशस्वी जैस्वाल 214 धावांवर आणि सरफराज 68 धावांवर परतला नाबाद

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मेन इन ब्लू संघाने 12व्या षटकात 30 धावांवर कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट गमावली.

  भारताने दुसऱ्या डावात 430/4 धावा करून डाव घोषित केला आहे. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) 214 धावा करून संघासाठी नाबाद माघारी परतला आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) 68 धावा करून नाबाद माघारी परतला. आक्रमक फलंदाजी करत भारताने इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी दीड दिवसांचा अवधी आहे.

  स्पर्धेचा चौथा दिवस सुरू आहे. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला, तेव्हा त्याच्या पाठीत दुखत होते. मात्र चौथ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीला आला आणि त्याने द्विशतक पूर्ण केले. जैस्वालने 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 214* धावा केल्या. या डावात 12 षटकार मारून जैस्वालने कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वसीम अक्रमची बरोबरी केली. आता जैस्वाल कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात इंग्लिश गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. संघाकडून रेहान अहमद, टॉम हार्टली आणि जो रूट यांनी 1-1 बळी घेतला. याशिवाय भारताची एक विकेट रनआऊट झाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Team India (@indiancricketteam)

  दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मेन इन ब्लू संघाने 12व्या षटकात 30 धावांवर कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट गमावली. भारतीय कर्णधार 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने केवळ 19 धावा करू शकला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 159 धावांची (201 चेंडू) भागीदारी केली, त्यानंतर जैस्वाल निवृत्त झाला. त्यानंतर रजत पाटीदार फलंदाजीला आला आणि 10 चेंडू खेळूनही खाते न उघडता बाद झाला. यानंतर गिल आणि कुलदीप यादव यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ (९८ चेंडू) धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवशी विकेट वाचवण्यासाठी कुलदीप नाईट वॉचमन म्हणून आला.

  यानंतर यशस्वी जैस्वालने सहाव्या क्रमांकावर आलेल्या सरफराज खानसोबत १७२* (१५८ चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान जैस्वालने 214* आणि सर्फराज खानने 72 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68* धावा केल्या. यानंतर रोहित शर्माने डाव घोषित करण्याची घोषणा केली.