विदेशींना मिळणार की भारतीय खेळाडूंना मिळणार भाव! आयपीएल लिलावासाठी ११६६ खेळाडूंची नोंदणी

इंडियन प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच मोठ्या विदेशी खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या लिलावाचा भाग असण्याबाबत शंका होत्या

    आयपीएल लिलाव : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये या आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. या लिलावामध्ये बरेच विदेशी खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या लिलावासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांच्यासह ११६६ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही, म्हणजेच जोफ्रा आर्चर आयपीएल लिलावाचा भाग असणार नाही. अलीकडेच मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला सोडले होते.

    इंडियन प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच मोठ्या विदेशी खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या लिलावाचा भाग असण्याबाबत शंका होत्या, मात्र या खेळाडूने लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. आयपीएल लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. या आयपीएल लिलावामध्ये भारताचे ८३० खेळाडू, तर ३३६ परदेशी खेळाडू आणि २१२ कॅप्ड खेळाडू असणार आहेत. याशिवाय ९०९ अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच सहयोगी देशांतील ४५ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.