amit rohidas and neelkant sharma

एफआयएच प्रो लिग 2022 (FIH Pro League 2022) चे हॉकीचे सामने बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी २० जणांची टीम भारताकडून निवडण्यात आली आहे. या टीममध्ये रेल्वेकडून खेळणारे अमित रोहिदास (Amit Rohidas) आणि नीलकांत शर्मा (Nilakanta Sharma) यांचा समावेश आहे.

    भारतीय रेल्वे मंत्रालयाने (Indian Railways) आज एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भारतीय रेल्वेने त्यांचे खेळाडू अमित रोहिदास (Amit Rohidas)आणि नीलकांत शर्मा (Nilakanta Sharma) यांची एफआयएच प्रो लिग 2022 (FIH Pro League 2022) साठीच्या भारताच्या पुरुष हॉकी संघात (Indian Hockey Team) निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. एफआयएच प्रो लिग 2022 चे हॉकीचे सामने बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये खेळले जाणार आहेत.

    एफआयएच हॉकी प्रो लीगसाठी निवडण्यात आलेल्या २० सदस्यीय टीममध्ये गोलकीपर सूरज करकेरा, पीआर श्रीजेश, डिफेंडर सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच  मिडफील्डमध्ये अनुभवी मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, शमशेर सिंह, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय फॉरवर्ड लाइनच्या जबाबदारीसाठी गुरजंत सिंह, मनदीप सिंह, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक यांनाही हॉकी संघामध्ये घेण्यात आलं आहे.