दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, धवनकडे नेतृत्व तर ‘या’ दिग्गजांना देण्यात आली विश्रांती

भारतीय संघाची निवड (Indian cricket team select) करण्यात आली आहे. शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर (South Africa) तीन टी-20 (t-twenty) सामन्यांची मालिका खेळत आहे. आज दुसरा टि-20 सामना गुवाहटी (Guhawati) येथे होत आहे. या मालिकेनंतर म्हणजे विजयादशमीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात वन डे मालिकेला (ODI series between India and South Africa) सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड (Indian cricket team select) करण्यात आली आहे. शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आता काही निवडक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर अनुभवी खेळाडूना डावलण्यात आलं आहे.

    असा असेल भारतीय संघ :

    शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान, सिराज, दीपक चहर