IND vs ENG: Unbeaten for 12 years, 17 consecutive series in pocket, what is the secret of India's victory at home?

Team India Home Series : टीम इंडियाने मागील 12 वर्षांत घरच्या मैदानावर सलग 17 वा कसोटी मालिका विजय प्राप्त केले आहेत. तर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या संघाचा भारताने घरच्या मैदानावर सुपडा साफ केला आहे.

  Team India Home Series : भारतीय संघाला रांची येथील कसोटी सामन्यात विजयासाठी 192 धावांचे आव्हान होते. 38 षटकांत पाच विकेट गमावत भारताने फक्त 120 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा अन् सरफराज असे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल मैदानात होते.

  भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली

  भारताला विजयासाठी 72 धावांची गरज होती. इंग्लंडचे फिरकी गोलंदाज भेदक मारा करीत होते. त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, असा अंदाज सर्वांनी वर्तवला. पण कठीण परिस्थितीमध्ये शुभमन गिल (नाबाद 52) आणि ध्रुव जुरेल (नाबाद 39) यांनी संयमी खेळी करत विजय मिळवून दिला. रांची कसोटी विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली.

  भारताने कसोटी मालिकेत बाजी मारली

  अखेरचा कसोटी सामना सात मार्च रोजी धर्मशाला येथे होणार आहे. पण त्याआधीच भारताने कसोटी मालिकेत बाजी मारली. मागील 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय होय. तर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या संघाचा भारताने घरच्या मैदानावर सुपडा साफ केला आहे.

  घरच्या मैदानावर पराभूत

  भारतीय संघ 2013 मध्ये अॅळिस्टर कूकच्या नेतृत्वातील इंग्लंडसंघाविरोधात घरच्या मैदानावर पराभूत झाला होता. पण त्यानंतर भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. मायदेशात भारतीय संघ इतका यशस्वी का झाला? भारतीय संघाचा पराभव करणं इतकं कठीण का आहे? त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात..

  फिरकीचं जाळं –
  भारताला भारतात पराभव करणं अशक्य आहे. ज्या संघाचे फलंदाज फिरकी चांगले खेळू शकतात, तोच संघ भारताला मायदेशात पराभूत करु शकतो. भारतीय खेळपट्टीवर चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी कऱणं आव्हानात्मक राहतं. काऱण, खेळपट्टीवर चेंडू अधिक टर्न होतो. पण गेल्या काही दिवसांत चेंडू तिसऱ्याच दिवशी जास्त टर्न होत असल्याचं दिसतेय. अनेक चेंडू खाली राहत असल्याचेही दिसले. अशा स्थितीमध्ये फलंदाजांचा फुटवर्क महत्वाचा ठरतो. उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्टीवर खेळणाऱ्या विदेशी फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीवर खेळणं कठीण जातं. मागील 20 वर्षांत हरभजनसिंह, अनिल कुंबळे, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यासारखे दर्देजार स्पिनर भारतीय संघात खेळले. या गोलंदाजांसमोर खेळं फलंदाजांसाठी कठीण जातं. भारताच्या विजयाचं हे एक मोठं काऱण आहे.

  बेंच स्ट्रेंथ –
  मागील 12 वर्षांत भारतीय संघ मायदेशात अजेय राहिला, त्याचं आणखी एक कारण म्हणजे मजबूत बेंच स्ट्रेंथ होय. वीरेंद्र सहवागची कमी रोहित शर्मानं भरुन काढली. सचिन तेंडुलकरची कमी विराट कोहलीनं भरली. राहुल द्रविडची कमी चेतेश्वर पुजाराने भरली, आता शुभमन गिल संभाळतोय. गोलंदाजीत.. झहीर खानची जागा जसप्रीत बुमराहने घेतली. सिराजही भेदक मारा करतोय. भज्जी-कुंबळेची जाहा अश्विन-जाडेजा यांनी घेतली. देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नेहमीच भारतीय संघासाठी फायद्याचा ठरलाय.

  तिसरा ‘एक्स’ फॅक्टर –
  भारतीय क्रिकेटचे चाहते जगभरात आहेत. भारताचा सामना कुठेही असला तरी स्टेडियम फुल्लं होतात. भारतात सामना असेल तर विचारुच नका.. चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद… हा भारताच्या विजयाचा एक्स फॅक्टर आहे. मागील 12 वर्षांत कसोटी क्रिकेट पाहण्यासाठीही भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. टीम इंडियाला सपोर्ट करणारे चाहतेही विजयाचा मोठा फॅक्टर आहेत. घरच्या गोंगाटाच्या गर्दीसमोर खेळल्याने पाहुण्या संघांवर दबाव वाढतो, त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. इतकेच नाही तर भारताच्या अनेक भागांतील उष्ण आणि दमट हवामानामुळे पाहुण्या खेळाडूंना, विशेषत: थंड हवामान असलेल्या देशांतून येणाऱ्या खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो. या परिस्थितीचा कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या सहनशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो.