India vs Pakistan T20 world cup 2021(LIVE) | विश्वचषकात IND VS PAK युद्ध : भारताला दोन मोठे धक्के, पाकिस्तान जबरदस्त फॉर्ममध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट1 month ago

विश्वचषकात IND VS PAK युद्ध : भारताला दोन मोठे धक्के, पाकिस्तान जबरदस्त फॉर्ममध्ये

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
19:58 PMOct 24, 2021

भारतीय संघाला दोन मोठे धक्के

भारताचा कर्णधार विराट कोेहलीने १४ बॉलमध्ये १४ धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने पहिला षट्कार सुद्धा लगावला आहे. तर सूर्यकुमार यादवने पहिला षटकार लगावात ६ बॉलमध्ये ११ धावा पूर्ण केल्या आहेत.

19:50 PMOct 24, 2021

भारतीय संघाला दोन मोठे धक्के

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला आहे. त्यानंतर केएल राहुलही त्रिफळाचीत होत तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे शाहीन आफ्रिदीनेच त्याचीही विकेट घेतली आहे.

 

19:30 PMOct 24, 2021

नाणेफेक जिंकत पाकिस्तानची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

 

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) आज टी-२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2021) सुपर-१२ मधील भारतविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा महामुकाबला होणार आहे. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये अद्याप भारतानं पाकिस्तानकडून एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आजही जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियांनं सन २००७ च्या टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला धूळ चारत ट्रॉफी पटकावली होती.

असे आहेत दोन्ही संघ…

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

पाकिस्तानी संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हारिस रऊफ, शाहीन आफ्रिदी.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०७ मंगळवार
मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढल्याने मुंबईतील समस्या वेगाने सोडविण्यास मदत होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.