आज भारतासाठी हॉकी विश्वातील सुवर्ण दिवस, कुस्तीपटूंनी पटकावली तीन कास्य पदके

आज भारताने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी जपानच्या कावाहरा यामातोला पिवळे कार्ड मिळाले होते. भारताने सुवर्ण जिंकले आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.

    आशियाई खेळात भारताच्या संघाला हॉकीत सुवर्ण : भारतीय पुरुष हॉकी संघाने एकतर्फी फायनलमध्ये जपानचा ५-१ ने पराभव केला आहे आणि सुवर्ण पदकावर कब्जा केला आहे. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारत आशियाई खेळामध्ये चौथ्यांदा यशस्वी झाला आहे. हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा ५-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर ताबा मिळवला आहे.

    भारताने या आधी १९६६ रोजी बँगकॉकमध्ये पहिल्यांदा हॉकीमध्ये सुवर्ण जिंकले होते आणि त्यानंतर १९८८ मध्ये पुन्हा एकदा बँगकॉक मध्ये सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर इंचॉन मध्ये २०१४ ला भारताला पुन्हा एकदा सुवर्ण मिळवून दिले होते. आज भारताने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी जपानच्या कावाहरा यामातोला पिवळे कार्ड मिळाले होते. भारताने सुवर्ण जिंकले आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.

    भारतीय कुस्तीपटू अमनने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइलमध्ये चीनच्या मिंघू लिऊचा ११-० ने पराभव करून कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये जपानच्या कैकी यामागुची विरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीत बजरंग पुनिया ०-१० ने मागे पडल्याने त्याला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या किरणने महिलांच्या फ्री स्टाईल ७६ किलो वजनी कुस्तीमध्ये थायलंडच्या अरिउंजर्गल गानबटचा ६-३ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. भारताच्या सोनमने सुद्धा भारताला कास्य पदक मिळवून दिले आहे.