भारताच्या महिला क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा, महाराष्ट्राच्या लेकीचं भारतीय संघात पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौर कर्णधार असणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर भारताच्या संघामध्ये महाराष्ट्राची श्रेयंका पाटीलनं संघामध्ये पदार्पण केलं आहे.

    भारताचा इंग्लड दौरा : १४ डिसेंबर २०२३ रोजी पासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. भारत महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यांनतर या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामान्यांची मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौर कर्णधार असणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर भारताच्या संघामध्ये महाराष्ट्राची श्रेयंका पाटीलनं संघामध्ये पदार्पण केलं आहे.

    भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला होणार आहे. यानंतर मालिकेतील शेवटचे दोन सामने अनुक्रमे ९ डिसेंबर आणि १० डिसेंबर रोजी होणार आहेत. टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी २१ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.

    इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
    हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकूर, टी. पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिनू मणी.

    भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार
    इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना २८ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर या मालिकेतील दुसरा सामना ३० डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २ जानेवारीला खेळवला जाईल. मात्र या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.