कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

    राष्ट्रकुल स्पर्धेत(Commonwealth Games 2022) भारताचा दिग्गज कुस्तीपटू (Wrestler) बजरंग पुनिया (Bajarang Puniya)याने भारतासाठी अजून एका सुवर्णपदक (Gold Medal)जिंकले आहे. ६५ किलो वजनी गटात बजरंग याने हे पदक पटकावले असून यासाठी त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे.

    बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या दिवशी भारताच्या कुस्तीपटूंनी कमाल कामगिरी केली आहे. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात राऊंड १६ मध्ये नॉरूच्या लॉवे बिंघमला ४-० ने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत अंतिम सामन्यात धडक दिली. फायनलमध्ये त्याने कॅनडाच्या मॅकनील याला ९-२ ने मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

    बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्ड मेडल आहे. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ६५ किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली होती. तर २०१४ ला ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. बजरंगच्या सुवर्ण पदकामुळे भारताचे पदक तालिकेत आता अजून एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे.