#Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्राच्या ‘गोल्ड’नं भारतीयांनी घेतला टोकियोचा निरोप

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे.

    भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. टोक्यो ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भालाफेकीत नीरजने भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

    भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले.

    २००८ नंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.  नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी २००८ मध्ये वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.