
Hardik Pandya injury update : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे विश्वचषकातल्या लागोपाठ दुसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशबरोबर झालेल्या सामन्यादरम्यान, वेगात चाललेल्या चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात तो पायावर पडला होता. त्यामुळे नेमकं काय झाले, वाचा सविस्तर रिपोर्ट
Hardik Pandya injury update : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे विश्वचषकातल्या (World Cup 2023) लागोपाठ दुसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पंड्याचा घोटा दुखावला (Hardik Pandya injury) होता.
उद्या होणार हार्दिकची फिटनेस चाचणी
त्यामुळे गेल्या रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून हार्दिक पंड्याची उद्या फिटनेस चाचणी घेण्यात येईल. या फिटनेस चाचणीनंतरच त्याच्या भारताच्या विश्वचषक संघातल्या पुनरागमनाची तारीख निश्चित करण्यात येईल.
फिरकी गोलंदाजांना खेळवण्यात येण्याची शक्यता
विश्वचषकातला भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी इंग्लंडशी (IND vs ENG) होणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार असून, त्यात तीन फिरकी गोलंदाजांना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हार्दिक पंड्याला आणखी विश्रांती मिळू शकते.
विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधून माघार
हार्दिक पंड्याला झालेली दुखापत आणि त्याला विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधून माघार घ्यावी लागणं भारतीय संघासाठी किती धक्कादायक आहे. भारतीय संघात समतोल साधण्याच्या दृष्टीनं हार्दिक पंड्यात अंतिम अकरा जणांमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. हार्दिक पंड्या सध्या बेंगळुरुमधील एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करीत आहे.
हार्दिक पांड्याच्या फिटनेसमध्ये सुधार
गुरुवारी हार्दिक पांड्याची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर त्याच्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या वृत्तनुसार हार्दिक पांड्याच्या फिटनेसमध्ये सुधार आहे. तो खेळण्यासाठी तयारही झालाय. पण खबरदारी म्हणून त्याला आणखी आराम देण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्यासाठी हार्दिक पांड्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
इकाना स्टेडिअममध्ये सामना रंगणार
भारत आणि इंग्लंड संघामध्ये रविवारी लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनौला लवकरच दाखल होणार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
लखनौची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी
लखनौच्या मैदानात आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण, लखनौची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे एका वेगवान गोलंदाजाला आराम दिला जाऊ शकतो. मोहम्मद सिराजला आराम देण्याची शक्यता आहे. इंग्लंडनंतर टीम इंडिया मुंबईत श्रीलंका संघाविरोधात खेळणार आहे. या सामन्यातही हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात पांड्या उपलब्ध असेल.