भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे वर्चस्व कायम, गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर

इंग्लंडचा कर्णधार जो रूट (९००) दुसऱ्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (८७९) स्टीव्ह स्मिथ (८७७) तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित, डेव्हिड वॉर्नर, कोहली, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम आणि ट्रॅव्हिस हेड टॉप १० मध्ये आहेत. कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल १० मध्ये अश्विन हा एकमेव भारतीय आहे. तो ८८३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

    नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने वर्चस्व कायम राखले आहे. गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनीही फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पाचवे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे. रोहितचे ७९७ आणि कोहलीचे ७५६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन (९१५ गुण) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

    इंग्लंडचा कर्णधार जो रूट (९००) दुसऱ्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (८७९) स्टीव्ह स्मिथ (८७७) तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित, डेव्हिड वॉर्नर, कोहली, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम आणि ट्रॅव्हिस हेड टॉप १० मध्ये आहेत. कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल १० मध्ये अश्विन हा एकमेव भारतीय आहे. तो ८८३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स अव्वल तर पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ टीम साऊदी आणि जेम्स अँडरसन यांचा क्रमांक लागतो.

    ऑस्ट्रेलियासाठी मेलबर्न कसोटी पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलंडने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ६/७ घेत २७१ रेटिंग गुण मिळवले आणि तो ७४ व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जेसन होल्डर अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ अश्विन, जडेजा, शाकिब अल हसन, मिचेल स्टार्क आणि बेन स्टोक्स यांचा क्रमांक लागतो. कसोटी संघाच्या क्रमवारीत भारत १२४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.