दोहा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका-अर्चनाला कांस्य पदक

उपांत्य सामन्यात लि यू-झून आणि चेंग आय-चिंग जोडीकडून मनिका बत्रा आणि अर्चना कामत जोडीला ८-११, ६-११, ७-११ असा पराभव पत्करला.

    दोहा : दोहा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत बुधवारी मनिका बत्रा आणि अर्चना कामत जोडीला महिला दुहेरीच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य सामन्यात लि यू-झून आणि चेंग आय-चिंग जोडीकडून त्यांनी ८-११, ६-११, ७-११ असा पराभव पत्करला. जी. साथियान आणि मनिका यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने गमावले. साथियानने स्वीडनच्या क्रिस्टियन कार्लसनकडून हार पत्करली, तर जर्मनीच्या यिंग हॅनने मनिकाला नमवले.