commonwealth games

राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं अव्वल ठरली. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत ३८ सुवर्णपदकासह एकूण १२३ पदकं जिंकली आहेत. तर ३८ सुवर्णपदकासह एकूण १०३ पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं (India) आतापर्यंत १८ पदकांची कमाई केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या एकूण पदकांची संख्या १२३ झाली आहे. (Commonwealth Games 2022) तसेच ब्रिटननं १०३ पदकं मिळवली आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेतील सहाव्या दिवशी पाच पदक जिंकल्यानंतरही भारताची (Medal List) पदकतालिकेत घरसण झाली आहे.

    राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं अव्वल ठरली. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत ३८ सुवर्णपदकासह एकूण १२३ पदकं जिंकली आहेत. तर ३८ सुवर्णपदकासह एकूण १०३ पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाच्या खात्यात आतापर्यंत १६ सुवर्णपदकासह एकूण ५७ पदकं आहेत.

    याशिवाय चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (१६ सुवर्ण, एकूण ३६ पदक), पाचव्या क्रमांकावर स्कॉटलंड (७ सुवर्ण, एकूण ३२ पदक), सहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (६ सुवर्ण पदक, एकूण २० पदक), सातव्या क्रमांकावर भारत (५ सुवर्ण, एकूण १८ पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (४ सुवर्ण, एकूण १७ पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया(३ सुवर्ण, एकूण ८ पदक) आणि दहाव्या क्रमांकावर नायजेरिया (३ सुवर्ण, एकूण ८ पदक) आहे.