भारताचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत रचला इतिहास

गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने आणि ७५९.२९ च्या स्ट्राइक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२३ धावांच्या नाबाद शतकाचाही समावेश आहे.

  ऋतुराज गायकवाड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काल शेवटचा पाच टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेमध्ये ऋतुराज गायकवाड T-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गजांसह जगभरातील दिग्गजांनाही मागे टाकले आहे. गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने आणि ७५९.२९ च्या स्ट्राइक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२३ धावांच्या नाबाद शतकाचाही समावेश आहे.

  क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण रुतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय भारताच्या या युवा फलंदाजाने या यादीत विराट कोहली आणि डेव्हन कॉनवे यांनाही मागे टाकले आहे.

  ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
  रुतुराज गायकवाड – २२३ धावा
  मार्टिन गप्टिल – 218 धावा
  विराट कोहली – १९९ धावा
  डेव्हॉन कॉनवे – १९२ धावा

  भारतासाठी एकाच टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाडही त्याच्या मागे आला आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव आघाडीवर असून त्यानंतर केएल राहुल आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड यांचा क्रमांक लागतो. या तिन्ही खेळाडूंनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.