INDw vs ENGw T20: England won the toss and opted to bowl, making changes to the playing eleven of both teams.
INDw vs ENGw T20: England won the toss and opted to bowl, making changes to the playing eleven of both teams.

भारत विरुद्ध इंग्लंड वुमन्स संघात टी20 मालिकेचा दुसरा सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौर हीनेही आम्हाला गोलंदाजी करायची होती, असे सांगितलं आहे. त्यामुळे नाणेफेक हरल्याने टीम इंडियाच्या गोटात निराशा असणार आहे. हा सामना काहीही करून भारताला जिंकावाच लागणार आहे. अन्यथा मालिका गमवावी लागणार आहे. तरी इंग्लडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा तिसरा सामना होण्यापूर्वीच इंग्लंड ही मालिका खिशात घालेल.

  भारतीय फलंदाजी ढासळली

  इंग्लडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले परंतु, भारतीय संघाच्या महिला खेळाडू इंग्लडच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकल्या नाहीत. एका मागोमाग एक विकेट जाण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे. भारताच्या 5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 33 धावा केल्या आहेत.

  भारताने नाणेफेकीचा कौल गमावला

  दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आम्ही धावांचा पाठलाग करणे पसंत करू. आमच्याकडे चांगले बॅटर्स आहेत. मालिकेत आघाडी घेतल्याने चांगले वाटत आहे. आम्ही गोलंदाजीत एक बदल केला आहे महिका गौरऐवजी संघात चार्ली डीनला संघात घेतलं आहे, असे इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हीने सांगितलं.

  हरमनप्रीत कौर नाराज

  दुसरीकडे नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर हरमनप्रीत कौर नाराज दिसली. आम्हीही गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. पण प्रत्येकवेळी कौल आपल्या बाजूने लागेल असं नाही. मागच्या सामन्यात दव पडलं नव्हतं. त्यामुळे आम्ही पहिली फलंदाजी करण्यास सकारात्मक आहोत. मागच्या चुकांमधून आम्ही फील्ड प्लेसमेंट आणि आम्हाला अधिक चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता असलेली क्षेत्रे काय आहेत ते समजून घेतलं. कनिका आहुजा ऐवजी संघात तीतास साधूला घेतलं आहे.”, असं कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.

  दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) : स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

  इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन) : सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल