आजपासून आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

    छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूरमध्ये आज १९ सप्टेंबर पासून आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत (India) आणि रशियासह (Russia) १५ देशांतील ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. छत्तीसगड सरकारचे क्रीडा आणि युवक कल्याण विभाग, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (All India Chess Federation) आणि छत्तीसगड ऑलिम्पिक असोसिएशन यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंना मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.

    आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा मास्टर्स आणि चॅलेंजर्स या दोन गटात खेळवली जाणार आहे. मास्टर्स गटातील विजेत्या खेळाडूंना २३ लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तर, चॅलेंजर्स गटात १२ लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत असून या स्पर्धेतही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    भारतात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतं भारत (India), रशिया (Russia), युक्रेन (Ukraine), जॉर्जिया (Georgia), यूएसए (USA), कझाकस्तान (Kazakhstan), मंगोलिया (Mongolia), पोलंड (Poland), व्हिएतनाम (Vietnam), कोलंबिया (Colombia), इराण (Iran), श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि नेपाळचा (Nepal) समावेश आहे. १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.