csk vs mi

मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Mumbai Indians Won The Toss) जिंकत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील ५९ वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI)या संघांमध्ये होत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Mumbai Indians Won The Toss) जिंकत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने ११ पैकी केवळ ४ सामने जिंकत ८ गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने ११ पैकी ९ सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे.

    आजच्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाच्या अंतिम ११ खेळाडूंचा विचार करता चेन्नईने संघात एकही बदल केलेला नाही. मुंबईने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.  मुंबईने त्यांचा स्टार खेळाडू केईरॉन पोलार्डला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी युवा खेळाडू ट्रीस्टन स्टब्सला संधी दिली आहे.

    चेन्नई अंतिम ११ – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह.

    मुंंबई अंतिम ११ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, ट्रीस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, ऋतिक रोशन, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय.