आज पंजाब विरुद्ध चेन्नई; १५ वेळा CSK, तर ११ वेळा PBKSचा विजय, पंजाबच्याविरोधात धोनीचा स्ट्राईक रेट १४८

चेन्नईच्या टीमची आत्तापर्यंतची वाटचाल फारशी समाधानकारक नाही. गेल्या वर्षी ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराजला आत्ता आत्ता सूर गवसू लागला आहे. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

    मुंबई : आज IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सिझनची सुरुवात पंजाबने बंगळुरुच्या विरोधात २०६ रन्सचा पाठलाग करत केली होती, नंतर मात्र या टीमची कामगिरी ढासळत गेली. दिल्लीने तर केवळ १०.३ ओव्हर्समध्ये टार्गेट पूर्म करत पंजाबचा पराभव केला. अशा स्थितीत कोणत्याही टीमच्या खेळाडूंचे मनौधैर्य खचते, तेच पंजाबच्या टीमचे झाले असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे धोनीच्या बॅटिंगमुळे शेवटच्या बॉलवर मुंबई इंडियन्सचा पराभव केल्याने, चेन्नईच्या टीमचे मनौधैर्य उंचावलेले आहे. त्यामुळे चेन्नईचे पारडे या मॅचमध्ये वरचढ आहे.

    चेन्नई टीम सुधारते आहे

    चेन्नईच्या टीमची आत्तापर्यंतची वाटचाल फारशी समाधानकारक नाही. गेल्या वर्षी ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराजला आत्ता आत्ता सूर गवसू लागला आहे. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मीडल ऑर्डरनेही निराशा केली होती. त्यामुळे चॅम्पियन टीम हे बिरुद मिळवणाऱ्या टीमच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत होते. आता ऋतुराजचा फॉर्म परतताना दिसतो आहे. त्याच्यासोबत रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेही चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. मात्र इतके असूनही ४० वर्षांचा धोनीच मॅच खेचून आणताना पाहायला मिळतोय. चेन्नईला प्ले ऑफ पर्यंत जायचे असेल तर चांगली कामगिरी आणि मोठे विजय मिळवावे लागतील. रवींद्र जडेजाकडूनही अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

    पंजाबच्या टीमला मोठ्या सुधारणेची गरज

    पंजाब प्रत्येक सीझनमध्ये काही चांगल्या मॅचेस जिंते मात्र काही सोप्या मॅच हरल्याने त्यांना बाहेर पडावे लागते. कॅप्टन मयंक अग्रवालनेही एखादी ङाफ सेंच्युरी वगळली तर मोठी कामगिरी केलेली नाही. बॅट्समन मोठा स्कोअर उभारु शकत नसल्याने, बॉलर्सकडे बचावासाठी फारसे काही उरत नाही, हा अनुभव आहे. रबाडा, अर्शदीप आणि राहुल चाहरकडून चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे. सेटबॅकनंतर पंजाबची टीम कमबॅक करेल का, हे आज पाहावे लागणार आहे.