आज राजस्थान विरुद्ध बंगळुरु; RR च्या विरोधात मॅक्सवेलचा स्ट्राईक रेट १५६, तर या सिझनमध्ये चहलनी घेतल्या आहेत १८ विकेट्स

    पुणे- राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही टीम सीझनमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पुण्याच्या एमसीएच्या स्टेडियमवर ही मॅच रंगणार आहे. पहिल्या मॅचमध्ये चार विकेट्सने आरसीबीने मॅच जिंकली होती. या मॅचपूर्वी एसआरएचविरोधात खेळताना बंगळुरुची टीम ६८ रन्समध्ये ऑलआऊट झाली होती. या कामगिरीचा परिणाम आजच्या रॉयल चँलेंजर्,च्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या विरोधात विराट चांगली बॅटिंग करतो, असा रेकॉर्ड आहे. विराटकडून चांगल्या कामगिरीची टीमला अपेक्षा असणार हे नक्की.

    दुसरीकडे राजस्थानच्या टीममध्य़े आत्मविश्वास जाणवतोय. दिल्लीला १५ रन्सने याआधीच्या मॅचमध्ये पराभूत केल्याने टीम विजयी मानसिकतेत आहे. राजस्थानची टीम या सीझनमध्ये चॅम्पियन्ससाखी खेळताना दिसते आहे. जोस बटलर आणि विजयेंद्र चहल राजस्थानच्या टीममध्ये आहेत. बटलरचा फॉर्म पाहता, या सीझनमध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम मोडण्याच्या तो तय़ारीत आहे. याच बरोबर संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल हेही चांगले खेळतायेत. युजवेंद्र चहलच्या सहभागामुळे बॉलिंगमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी आणि ट्रेंट बोल्ड हे तिघेही पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेत आहेत. जर पूर्ण टीम एकत्रित खेळली तर बंगळुरुसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

    बंगळुरु टीमची कसोटी

    बंगळुरुने राजस्थानप्रमाणेच पाच मॅचेल जिंकल्या आहेत. पण बंगळुरुला चांगल्या ओपनिंग पार्टनरशीपची गरज आहे. अनुज रावतने एक खेळी चांगली केली असली तरी त्याने सातत्य राखलेले नाही. प्रत्येक मॅचमध्ये दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिसची जोडी यश मिळवून देण्यास पुरेशी नाही. इतर क्रिकेटर्सनीही चांगला खेळ करण्याची गरज आहे.