१९ डिसेंबरला लागणार खेळाडूंवर बोली, कोठे आणि कधी पाहायचा आयपीएल २०२४ चा लिलाव?

आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी एकूण ३३३ खेळाडूंनी आयपीएल लिलावात आपली नोंदणी केली आहे. यामध्ये भारतासह एकूण १२ देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

    आयपीएल २०२४ लिलाव : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल २०२४ साठी १९ डिसेंबर रोजी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयपीएलचा लिलाव दुबईत होणार आहे. भारतातील या लिलावात जगभरातून अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. तुम्हालाही कोणत्याही OTT अॅपचे सबस्क्रिप्शन न घेता मोबाइलवर यंदाचा आयपीएल लिलाव अगदी मोफत पाहायचा असेल, तर आम्ही तुम्हाला ते करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.
    वास्तविक, यावेळी दर्शक त्यांच्या घरून किंवा कोठेही त्यांच्या मोबाइल फोनवर आयपीएल २०२४ चा लिलाव विनामूल्य पाहू शकतात. ही मोफत सेवा Jio Cinema कडून दिली जात आहे. यासाठी, वापरकर्त्यांना फक्त त्यांच्या मोबाइल फोनवर Jio Cinema मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल आणि नंतर स्पोर्ट्स श्रेणीमध्ये जाऊन IPL 2024 Auction Live च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, दर्शक त्यांच्या स्मार्टफोनवर IPL लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
    मात्र, आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी एकूण ३३३ खेळाडूंनी आयपीएल लिलावात आपली नोंदणी केली आहे. यामध्ये भारतासह एकूण १२ देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी लिलावात असोसिएट नेशन्समधूनही दोन खेळाडू येणार आहेत. या ३३३ खेळाडूंमध्ये भारताचे सर्वाधिक २१४ खेळाडू असतील, तर विदेशी खेळाडूंची संख्या ११९ असणार आहे. भारतानंतर या लिलावात सर्वाधिक खेळाडू इंग्लंडचे असणार आहेत. म्हणजेच लिलावात सर्वाधिक २५ परदेशी खेळाडू फक्त इंग्लंडचेच असतील. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे नाव या यादीत आहे, ज्यांच्या एकूण २१ खेळाडूंनी लिलावात आपली नावे नोंदवली आहेत. त्याचवेळी, क्रिकेटच्या सहयोगी देशांपैकी नामिबिया आणि नेदरलँड्सचा प्रत्येकी एक खेळाडू यावेळच्या आयपीएल लिलावात सहभागी होत आहे.